Manoj Jarange Patil: उद्या (१७ डिसेंबर) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार व सामूहिक बेमुदत उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच ज्यांना उपोषणाला बसायचे आहे तेच बसतील कोणावरही दबाव नाही, घरच्यांचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्व मराठे अंतरवालीत येतील असाही इशारा जरांगे यांनी दिला आहे.