Santosh Deshmukh: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. परंतु, संतोष देशमुख यांच्या भावाने धनजंय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केला. संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं.