बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि नेते अनिल कोकीळ यांनी आज विविध मागण्यांचे निवेदन घेत मनपा आयुक्तांची भेट घेतली. मात्र पालिका बेस्टची पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी मांडल्यानंतर सुहास सामंत आणि अनिल कोकीळ यांनी संताप व्यक्त केला आहे.