Sushma Andhare Press Conference Live: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आज नागपुरात पार पडला. तत्पूर्वी काल १६ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला तरीही अद्याप खातेवाटप बाकी आहे. दुसरीकडे आज पत्रकार परिषद घेत या सगळ्या मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. अधिवेशनात लक्षवेधी न मांडू देण्याबाबत सुद्धा अंधारेंनी आक्रमक भूमिका मांडली आहे.