शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक दावे करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.