Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, प्रियदर्शनी नगर, परभणी येथे पोलिसांची क्रूरता पाहा. एका नवजात मुलाच्या आईला तिच्या घरात पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते पण पोलिसांनी तिचा दरवाजा तोडला आणि तिला बेदम मारहाण केली. या आईने काय गुन्हा केला? पोलिसांची क्रूरता नियोजित होती का? सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या कोणी केली?