राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने उघड नाराजी व्यक्त केली. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “छगन भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं, आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे”. पटेलांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर जायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तेव्हा मला नकार देण्यात आला आणि आता मी आमदार म्हणून निवडून आलो आहे तर आता मला राज्यसभेवर जायला सांगतायत. मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?”