राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट त्यांचे सांत्वन केलं. आमदार रोहित पवार कुटुंबाशी संवाद साधला त्यावेळी सोमनाथच्या आईने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली.