मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक नेते नाराज आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांची नावे आहेत. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता, ते म्हणाले आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
मंत्रिपद देताना नेत्याचा देखील कस लागतो. मात्र जर मंत्रिपद देऊन मी चांगलं काम केलं नाही तर ज्या नेत्यांनी मंत्रिपद दिलं आहे ते
काढून पण घेऊ शकतात, असं उदय सामंत म्हणाले.