भीमा कोरगाव येथे झालेली दंगल आणि परभणीत घडलेला हिंसाचार या घटनांवेळी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्यांकांवरील अन्याय, अत्याचार वाढत राहतात, असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.