छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार यांच्या विरोधात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. त्याचबरोबर महायुतीच्या भूमिकेवरही संताप व्यक्त करण्यात आला.