छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. पुण्यात समता परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. याची दखल घेत छगन भुजबळ यांनी समर्थकांना तंबी दिली आहे. तुमचा राम, दुःख सुसंस्कृत पद्धतीने व्यक्त करा, असं आवाहन केलं आहे.