केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. त्याचे पडसाद आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. विरोधकांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.