Mumbai Boat Accident Video : मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृ्त्यू झाला आहे. नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवाशी बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. उशीरापर्यंत या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. हा अपघात झाल्यानंतर आता या धडकेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं.