केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. त्याचवेळी भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसविरोधात आंदोलन पुकारलं. यावेळी भाजपा खासदार आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आले आणि धक्काबुक्की झाली. यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी जखमी झाले असून
राहुल गांधींनी आपल्याला धक्का दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.