Santosh Deshmukh Murder Case: गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मु्द्दा चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी या प्रकरणावर चर्चेची मागणी करत सभात्याग केला. आज यासंदर्भात विधानसभेत चर्चेदरम्यान बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्विग्न भूमिका मांडत अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली. “बीडमध्ये गुन्हेगारी कशामुळे वाढली?” असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला.