वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने १० आण् ११ वर्षाच्या विद्यार्थ्यासह अन्य विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार नृत्य शिक्षकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नृत्य शिक्षकाला न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, नृत्य शिक्षकाने बालकांवर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.