Devendra Fadnavis: विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपती एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो, आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींती निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधा पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचेदेखील आभार मानतो.