Eknath Shinde On RSS : विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार (१९ डिसेंबरला) सकाळी ८ वाजता संघ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले.