Ajit Pawar:विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे (Ram Shinde) यांची आज (१९ डिसेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेमध्ये बोलताना राम शिंदे यांना सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर मिश्किल टिप्पणी देखील केली.