Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता, अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. तसेच “हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत.”, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली.