Kalyan Fight Video MNS: कल्याण पश्चिमेकडील योगिधाम येथील अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यात अभिजीत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी देशमुख व शुक्ला या दोघांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत. या प्रकरणी मनसेने पोलीस स्टेशनला भेट दिली व अखिलेश शुक्ला यावर कारावाईची मागणी केली आहे. चोवीस तासात आरोपीला अटक करावी नाही मनसे रस्त्यावर उतरेल असे मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितले आहे.