Karnataka MLA Laxman Savadi Demand Mumbai Union Territory : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगावात सीमावाद सुरू असतानाच कर्नाटकच्या एका आमदाराने आता थेट मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विकासाचा मुद्दा चर्चेत होता. या चर्चेदरम्यान अथणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणी आता शिवसेना अशी मागणी खपवून घेणार नाही म्हणत आमदार आदित्य ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नेमकं हे एकूण प्रकरण काय, पाहूया.