Sanjay Raut: कल्याणच्या (Kalyan) योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.एकीकडे मनसेनं मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.