Kalyan Society Scuffle : कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना पाहायाला मिळत आहे. शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा मारहाणीचा प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.