Devendra Fadnavis: कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत भाष्य केलं आहे. “अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानीत होईल असे उद्गार काढले, भांडण मारामारी केली. यातून एक संतापाची लाट लोकांमध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर आणि पत्नीवर एफआयआर नोंद झाला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील”, असं फडणवीस म्हणाले.