Devendra Fadnavis: कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वर्तुळात देखील या घटनेची चर्चा झाली. अशातच आता अखिलेश शुक्ला यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.