Sharad Pawar: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेचे विधानसभा व लोकसभेतही पडसाद उमटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी विधानसभेत तर,खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्यायाची मागणी केली. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मस्साजोग गावात दाखल झाले. पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.