Parbhani Somnath Suryavanshi Death: परभणी हिंसाचार प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी स्वतः अजित पवार पोहोचले होते. शरद पवार यांनी सुद्धा यापूर्वी सोमनाथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. -विरोधकांना फक्त विरोधी भूमिका मांडायची असते आम्ही मार्ग काढायला आलो आहोत असे म्हणत अजित पवारांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.