Pune Book Festival Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने भेट दिलीये. या पुस्तक महोत्सवात नाचायला नाही तर पुस्तक वाचायला आले आहे असं म्हणत गौतमीने या बूक फेस्टिव्हलमध्ये येऊन आपण खूप उत्साहित असल्याचे सांगितले. आतापर्यंत वाचनासाठी वेळ काढत नव्हते, पण आता फावल्या वेळेत वाचनाची ही चांगली सवय जोपासणार असल्याचे तिने तिने यावेळी सांगितलं.आज या पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची असा काही ठोस विचार मी केलेला नाही, उलट प्रवीण ( तरडे) दादांनाच मी सांगितलं की तुम्ही मला सुचवा पुस्तकांची नावं,कोणती पुस्तकं घेऊ ते सांगा. पण छत्रपती शिवाजी महाराजाचं पुस्तक मी नक्की घेणार आणि ते आवडीने वाचणार असल्याचं गौतमीने सांगितलं.