Maharashtra Cabinet Portfolio : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर (२१ डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे.