लोकसत्ता लोकांकिकाच्या महाअंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पंकज त्रिपाठी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत ‘दशावतार’ ही महाराष्ट्रातील लोककला शिकण्यासाठी कोकणात गेले होते. यावेळी आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह बोलताना सांगितले आहे. पंकज त्रिपाठी यांनी नुकतीच लोकसत्ता लोकांकिकेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील अनुभवांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.