Maharashtra Assembly Winter Session Nagpur Jayant Patil: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. सहा दिवस चाललेल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजवला तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी. आपल्या मिश्किल भाषणाने त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले. त्याला सभागृहातून दादही मिळाली. यावेळी में मायके चली जाऊंगी गाण्याचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी फडणवीस व त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना कोपरखळ्या दिल्या आहेत.