Kalyan Violence: कल्याण पूर्व काटेमानवली कामना नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समजतेय. आठ ते दहा जणांच्या टोळीने घरात घुसून उत्तरप्रदेश येथील जमिनीच्या वादातून एकाला मारहाण केली आहे. कोयता ,लोखंडी रॉड लाकडी दांडक्याने रमाशंकर दुबे यांना मारहाण झाली आहे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस तपास करत आहेत.