Kalyan Violence: मानपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलिसांकडे कल्याणमधील एका इमारतीत झालेल्या हाणामारीच्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. यामध्ये एका मराठी कुटुंबाला पांडे नावाच्या व्यक्ती व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याचे समजतेय. लहान मुलांच्या भांडणावरून हा वाद झाला असेही पोलिसांचे म्हणणे आहे. यात एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार सुद्धा समोर येतोय.