Pune Dumper Accident: पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.या तीन मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण,एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.तर हे दोघे जण बहिण भाऊ आहेत.या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष या तीन जणांची मृत्यू झाला आहे.