Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy: कल्याणमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यानं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पेण शहरात भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून ,’मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो…’ असे ती ग्राहकाला हिंदीमध्ये सांगताना दिसत आहे. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेच्या या अरेरावीचा, उद्धटपणाचा, हा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्यावरून वादाच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान या परप्रांतीय महिलेविरूद्ध पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेला ताब्यात घेतले आहे.