राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची लग्नसोहळ्यात झालेली भेट रविवारी २२ डिसेंबरपासून चांगलीच चर्चेत आहे. ठाकरे बंधू ज्याप्रमाणे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले त्याप्रमाणे राजकीय पटलावर एकत्र दिसणार का याविषयी संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी आपले राज ठाकरेंच्या कुटुंबासह कधी काळी मित्रत्वाचे नाते होते असं म्हणत असतानाच त्यांनी भाजपची साथ दिल्यामुळे राज ठाकरेंची विचारधारा पटत नसल्याचे म्हटले आहे. राज व उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार यावर राऊतांनी दिलेलं उत्तर संपूर्ण ऐका.