Uddhav Thackeray Meets Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. ती काय होती त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का या चर्चांना मुंबईतल्या राजकीय वर्तुळात हे दोन बंंधू आणि राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चां सुरु झाल्या आहेत. मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब पोहचल्याचं पाहण्यास मिळालं. दरम्यान यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये.