Chandu Chavan slams Modi Government: लष्करातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून जवान चंदू चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते, तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चंदू चव्हाण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मोदी यांच्या सरकारवर तसेच संरक्षण मंत्र्यांवर हे सैनिक चव्हाण गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत.