Nitin Gadkari Apology: नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाची पाहणी केली. तसेच यावेळी या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी नागपूरच्या जनतेची जाहीर माफी मागितली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी एअरपोर्ट ऑथोरिटी आणि मिहान अधिकारी उपस्थित होते.