Santosh Deshmukh : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या प्रकरणावर एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुणीही मास्टरमाईंड असेल तरीही त्याला आम्ही कुणीही सोडणार नाही.”,असं अजित पवार म्हणाले.