परभणी हिंसाचार प्रकरणानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. “सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.