Somnath Suryawanshi Mother:आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे. तर यानंतर सोमनाथच्या आईनेही माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असं म्हटलं आहे.