Nitesh Rane Onion Garland in Baglan: अवघ्या काही दिवसात कांद्यांचे गडगडलेल्या दरामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या रोषाला सोमवारी रात्री नवनिर्वाचित मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांना तोंड द्यावे लागले. बागलाण तालुक्यातील चिराई येथे एका कार्यक्रमात राणे भाषणासाठी उभे राहिले असता त्यांच्या गळ्यात अचानक एका शेतकऱ्याने कांद्यांची माळ घातली. ध्वनिक्षेपकावर संबंधित व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कांद्याची माळ घालणारी व्यक्ती कांदा उत्पादक असल्याचे सांगितले जा