Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २१ डिसेंबरला त्यांना ठाण्याजवळच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत त्यांना बरं वाटेल, त्यांना फिजिओ थेरेपीची जास्त गरज आहे त्यामुळे आमचा भर त्यावर आहे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विनोद कांबळीने सचिनला एक निरोप दिला आहे तसंच मी मरणार नाही असंही त्याने म्हटलं आहे.