Sanjay Shirsat, Student Hostel: संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच आज ऍक्शन मोडवर येत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला सरप्राईझ भेट दिली. यावेळी हॉस्टेलची दुर्दशा पाहून शिरसाट भडकले होते. पाच लोकांचा स्टाफ आहे त्यातील तीन लोकं गैरहजर आहेत अशा पद्धतीने जर वसतीगृहाचा कारभार चालत असेल तर महाराष्ट्रात सगळीकडे अशीच अवस्था असेल. मी परवा समाजकल्याण आयुक्तांना भेटणार, त्यांना सांगणार की तु्म्ही सर्व जाऊन पहा. यांना जो भरघोस निधी दिला जातो तो जातो कुठे? या मुलांची अवस्था अशी का? या सगळ्याची उत्तरे आयुक्तांकडून घेणार आहे . 28 तारीखला पुण्याला समाजकल्याण विभागातील जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक घेणार, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.