Kalyan Minor Girl Murder & Rape Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता घरातून बाहेर पडली होती. कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली. त्यांनी तिला फूस लावून स्वताच्या घरी आणले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून राहत्या घरातच तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीला आली आहे. विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केला.