Kalyan Minor Girl Rape & Murder Case: कल्याणमधील चक्कीनाका भागातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विशाल गवळीला गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हजर केले. यावेळी न्यायालयाने विशालला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी विशालची पत्नी साक्षीला हिलाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या समोर विशाल, पत्नी साक्षी यांना गुरुवारी सकाळी पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या गुन्ह्याचे स्वरुप पाहून आणि पोलिसांना या प्रकरणात अधिकचा तपास करायचा असल्याने विशाल, साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले..