बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय मुंडे यांच्या जवळचे असेलेले वाल्मिक कराड यांचेही नाव समोर येत आहे. कारड यांचे नाव घेत अनेक आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अशात विरोधक धनंजय मुंडेंनाही यावरून लक्ष्य करत आहेत. आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी असे म्हटले आहे. याचबरोबर या प्रकरणात माझ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका असे ते म्हटले आहेत.